About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती गडहिंग्लज

Schemes

विद्यार्थ्यांना–उपस्थिती भत्ता.

  • योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती अनु. जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रत्येक हजर दिवसासाठी रु.१ प्रमाणे वार्षिक रु. २२० /- चे मर्यादेत मदत केली जाते.
  • योजनेचे निकष –

प्रत्येक महिन्याला ७५% पेक्षा जास्त दिवस हजरी असणे आवश्यक

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून  गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

शिष्यवृत्ती परिक्षा माध्यमिक व पूर्व माध्यमिक परीक्षा फी .

  • योजनेचे स्वरूप –

या योजनेअंतर्गत 100 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेचा लाभ मिळावा व स्पर्धात्मक परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी परीक्षा फी मध्ये सवलत

 

  • योजनेचे निकष –

मागासवर्गीय मुलांची १०० टक्के फी व सर्वसाधारण घटकांतील मुलांची ५० टक्के फी भरणेत येते.

 

  • अंमलबजावणी – सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

राजर्षि शाहू सर्वागींण शिक्षण व गुणवत्ता विकास कार्यक्रम .

  • योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुल शाळेत आणणे, सर्वागीण / दर्जेदार शिक्षण देणे, शिक्षकांची गुणवत्ता व उपक्रमशीलता वाढवणे, शिक्षकांना अधिक सक्षम करणे, शिक्षणाची लोक चळवळ निर्माण करणे, प्रशासन सुलभीकरण करणे, 100 टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती, विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास करणे, माता पालक संघ व शिक्षक पालक संघाची स्थापना करणे. एकूण शाळेची गुणवत्ता वाढवणे.

 

  • योजनेचे निकष –

विद्याथी सर्वागीण विकास उपक्रम, उपस्थिती बौध्दिक विकास, सराव चाचणी पध्दत, मूल्यशिक्षण, शारिरीक विकास, भावनिक विकास, राष्ट्रीयत्वाची जोपासना इ. संबंधी उपक्रम राबविणे, सामाजिक व पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करणे, शिस्त व सहकार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, वैयक्तिक गुणवत्ता वाढ, सामाजिक सेवा कार्यक्रम व अन्य कार्यक्रम राबविण्यात येतात. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच पालक उद्बोधन, महिला सबलीकरण, शैक्षणिक उठावासाठी व वंचित घटकासाठी उपक्रम राबविण्यात येतात.

 

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची आमंलबजावणी  तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केले जाते.

जि. प. शाळेतील विद्यार्थ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजन करणे .

  • योजनेचे स्वरूप –

या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याची तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर सांस्कृतिक स्पर्धा घेणेत येते या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्याना बक्षिस व प्रमाणपत्र दिले जाते.

 

  • योजनेचे निकष –

वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन गटांमध्ये तालुकास्तरावर स्पर्धा घेवून विजयी खेळाडूंना व संघाना जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी पाठविले जाते.

 

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची आमंलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केले जाते.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.

महात्मा गांधी नरेगा २००८ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरु

योजनेची वैशिष्ट्ये

१८ वर्षावरील पौढ व्यक्तींना वर्षभर अकुशल रोजगाराची हमी

मजुरांची नोंदणी व जॉब कार्ड

  • रोजगार मिळविण्याकरिता जॉब कार्ड आवश्यक
  • जॉब कार्डसाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज करणे आवश्यक
  • १५ दिवसांत विनामुल्य जॉब कार्ड मिळणार
  • प्रत्येक कुटुंबाला एक जॉब कार्ड
  • जॉब कार्डची एक प्रत ग्रामपंचायतीमध्ये व एक प्रत कुटुंबाकडे

 

 कामाची मागणी व अर्ज

  • रोजगार आवश्यक असणाऱ्या नोंदणीकृत व्यक्तीने वेळोवेळी नमुना क्रमांक ४ मध्ये अर्ज करणे आवश्यक
  • नमुना क्रमांक ४ मध्ये अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतीने पोच पावती देणे आवश्यक
  • नमुना क्रमांक ४ ग्रामपंचायत कार्यालयामध्ये मिळतील
  • रोजगाराची मागणी नोंदणीकृत व्यक्ती किंवा समूह नमुना ४ मध्ये करू शकतो
  • मागणी केल्यानंतर मजुराला १५ दिवसांत ग्रामपंचायतीने रोजगार पुरविणे आवश्यक अन्यथा बेरोजगार भत्ता मिळेल
  • मजुराने किमान ०७ दिवस सलग काम करणे आवश्यक
  • कामाच्या मागणीबाबत ग्रामपंचायतीने गटविकास अधिकारी यांना तत्काळ कळवावे
  • गावापासून ५ कि.मी. परिसरात रोजगार उपलब्ध केला जाईल अन्यथा जास्त अंतराकरिता प्रवास खर्चाची तरतूद

 

मजुरीचे दर

स्त्री व पुरुष मजुरांना केंद्रशासनाव्दारे दरवर्षी निर्धारित केलेल्या समान दराने मजुरी

केलेल्या कामाच्या प्रमाणात ( मोजमापानुसार ) मजुरीची निश्चिती

 

सोयी व सुविधा

रोजगाराच्या जागी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार, लहान मुलांची देखभाल याकरीता मुलभूत सुविधा उपलब्ध

बँकव्दारे अथवा पोस्टामार्फत मजुरीचे प्रदान

 

कामाची निवड

ग्रामसभा अथवा ग्रामपंचायतीने कामांची शिफारस करावी तसेच हाती घ्यावयाच्या कामांचा प्राधान्यक्रम ठरवावा

योजनेंतर्गत सामुहिक तथा वैयक्तिक लाभाची कामे, कायमस्वरूपी मालमत्ता निर्माण करणे हे योजनेचे वैशिष्ट्य

सार्वजनिक अथवा वैयक्तिक लाभार्थ्यांच्या कामातील कुशल कामे ग्रामपंचायतींमार्फत करावी

जुनी कामे पूर्ण करूनच नवीन कामे हाती घेणे आवश्यक

एकूण कामांपैकी किमान 50% कामे ग्रामपंचायतींमार्फत, उर्वरित कामे इतर यंत्रणांमार्फत

मजुरांची कामाची मागणी व मागणीनुसार कामे पुरविणे यांची सांगड घालण्यासाठी दरवर्षी लेबर बजेट तयार करणे आवश्यक

अकुशल – कुशल प्रमाण ग्रामपंचायत स्तरावर व यंत्रणेच्या कामांसाठी तालुका स्तरावर 60:40 राखणे

कंत्राटदार नेमण्यास व यंत्र वापरण्यावर बंदी

ग्राम रोजगार सेवक

योजनेच्या अंमलबजावणीत ग्रामसेवक यांना मदत करण्यासाठी ग्रामपंचायतीद्वारे ग्राम रोजगार सेवकांची नियुक्ती

कागदपत्रे सांभाळणे व दैनंदिन उपस्थितीची नोंद घेणे ही ग्राम रोजगार सेवकांची जबाबदारी

ग्राम रोजगार सेवकांचे मानधन ग्रामपंचायतीमार्फत बँक खात्यावर जमा होणार

पारदर्शकता

झालेल्या सर्व कामांचा तपशील व खर्च यांची माहिती ग्रामसभेला देण्यात येणार

कामाच्या ठिकाणी कामाचे फलक लावणे आवश्यक

मजुरांची हजेरीपट सर्वांना माहितीसाठी उपलब्ध असणार

झालेल्या कामांचे सामाजिक अंकेक्षण

नवीन उपक्रम

पंधरवड्यात ग्राम रोजगार दिनाचे आयोजन

माहिती व तक्रार निवारणासाठी हेल्पलाईन सुरु (1800223839)

53030 क्रमांक वर सशुल्क SMS

तक्रार निवारण प्राधिकारी ( ombudsman) चे सक्षमीकरण

राज्य गुणवत्ता व्यवस्थापन निरिक्षक (State Quality Monitor) ची नियुक्ती

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

राज्यभरात ई – मस्टर लागू

आधारमार्फत नरेगाची मजुरी अदा

इलेक्ट्रॉनिक निधी व्यवस्थापन प्रणालीची (EFMS) सुरुवात

मजुरांना मजुरी प्रदानाची वेतन चिठ्ठी (Payslip) मिळणार

योजनेंतर्गत अनुज्ञेय कामे

जलसंधारण व जलसंवर्धन कामे

माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, ढाळीचे बांध (ग्रेडेबंडिंग), कंपार्टमेंट बांध, गॅबियन बंधारा, वनराई बंधारा, सलग समतल चर, ट्रेंच कम माउंट व तत्सम कामे

जलसिंचनाची कामे

तलाव व कालव्यातील गाळ काढणे / सफाई, अस्तरीकरणव नूतनीकरण, मातीचे कालवे, नदी – नाल्यांचे पुनरुज्जीवन

दुष्काळ प्रतिबंधक कामे (वनीकरण व वृक्ष लागवडीसह)

पडिक (गायरान) जमिनीवर वृक्ष लागवड व वैरण विकास योजना, रोपवाटिका, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन

 

रस्ते

गावातील बारमाही रस्ते, जोडरस्ते, स्मशानभूमी / पाणीपुरवठा विहिरीकडे जाणारे सिमेंट काँक्रीट / पेवर ब्लॅाक्स वापरून केलेले रस्ते

वैयक्तिक लाभाची कामे  

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील, भूसुधार योजनेतील इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी व वन अधिकार अधिनियमानुसार प्राप्त वन निवासी यांकरिता सिंचन विहिरी, शेततळी, फळबाग, भूसुधारणा इ. वैयक्तिक लाभाची कामे

सर्व जिल्ह्यात गावपातळीवर

खेळीची मैदाने तयार करणे

राजीव गांधी सेवा केंद्र

राज्य रोहयो अंतर्गत ‘क’ वर्ग नगरपालिकांचा समावेश

योजनेंतर्गतनवीन कामे

कृषी विषयक कामे

नॅडेप कंपोस्टिंग, गांडूळ खत तयार करणे (Vermi Composting). जैविक खते (Liquid Bio – manures),

पशुधन विषयक कामे

कुकुड पालनासाठी शेड, शेळ्या – बकऱ्यांसाठी शेड, कोबा करणे (Construction of pucca floor), युरीन टँक, चारा साठवण्याची व्यवस्था, अझोला – पूरक पशुखाद्य देण्याची व्यवस्था

मत्स्यव्यवसाय विषयक कामे

सार्वजनिक जमिनीवर हंगामी साचणाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय

समुद्रकिनारी भागातील कामे

समुद्र किनाऱ्यावर मासे सुकविण्यासाठी क्षेत्र (Fish Drying Yards) उपलब्ध करून देणे, बेल्ट व्हेजिटेशन

ग्रामीण क्षेत्रात पिण्याच्या पाण्यासंबंधीची कामे

पिण्याच्या पाण्यासाठी साठवण खड्डे (Soak pits),

ग्रामीण स्वच्छतेची कामे

वैयक्तिक शौचालये, शाळेकरिता शौचालये, अंगणवाडी शौचालये, शोष खड्डे, उघडी गटारे, घनकचरा व्यवस्थापन

योजनेची माहिती :  www.nrega.nic.in www.mahaegs.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध

 

 

 

 

 

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना
लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी लाभार्थीकडे पशुधन उपलब्ध असावे, बायोगॅस बांधकामासाठी घराजवळ मोकळी जागा उपलब्ध असावी.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती लाभार्थीने बायोगॅसचे बांधकाम पंचायत समिती अथवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करताच त्याची पहाणी करुण जसे अनुदान उपलब्ध होईल त्याप्रमाणे अनुदान वाटप केले जाते.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे पशुधनाबाबत ग्रामसेवक यांचा दाखला व रिकाम्या जागेबाबतचा उतारा
या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) बायोगॅस पूर्ण झालेनंतर व शासनाकडून अनुदान प्राप्त होताच लाभार्थीस त्याचे नावे अनुदान आदा केले जाते.
अनुदान वाटपाची पद्धत वरील अनुक्रम नंबर ६ प्रमाणे
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) काही नाही.
१० अन्य फी (असल्यास) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज को-या कागदावर करुन भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. कृषि विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) वरील अनुक्रम नंबर ५ प्रमाणे
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना वरील अनुक्रम नंबर ५ प्रमाणे

बायोगॅस सयंत्र व अनुदान – 

सयंत्रची क्षमता
सर्वसाधारण लाभार्थीसाठी अनुदान रु.
अनुसूचित जाती लाभार्थीसाठी अनुदान
१ घनमिटर
५,५००/-
७,०००/-
२ ते ६ घनमिटर
९,०००/-
११,०००/-
बायोगॅसला शौचालय जोडलेस सर्वसाधारण व अनिसुचीत जातीसाठी रु. १,२००/- अतिरिक्त अनुदान मिळते.

 

विशेष घटक योजना

अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणेची योजना (विशेष घटक योजना )

१. लाभार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा. जातीचा दाखला तहसीलदार, प्रातांधिकारी यांच्याकडील असावा .

२. लाभार्थीकडे स्वत:चे नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमिनीचे क्षेत्र ६ हेक्टर पेक्षा कमी असावे.

३. ७/१२ व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.

४. लाभार्थीचे वार्षिक उत्पन ५०,०००/- पेक्षा कमी असले बाबत तहसिलदार यांचा दाखला असणे आवश्यक आहे.

५. यापूर्वी  सादर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

६. जे लाभार्थी दारिद्रय रेषे खालील आहेत त्यांना ग्रामसेवक, तलाठी यांच्या सहीचे दाखले चालतात.

अर्ज पंचायत समिती कृषी विभागामार्फत सादर करावा.

अनुदान मर्यादा  – जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेतील त्यांचे साठी रु १,00,000/- व जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार नाहीत त्यांचे साठी रु.  ५०,०००/- कमाल मर्यादा राहील.

योजनेअंतर्गत बाबवर कमाल अनुदान दर्शविणारा तक्ता

अ.नं.
बाब
अनुदान टक्केवारी
कमाल अनुदान मर्यादा
जमीन सुधारणा
१००%
रु. ४०,००० च्या मर्यादेत मृदसंधारण निकषानुसार
निविष्ठा पुरवठा ( खते, बियाणे, औषधे इ.)
१००%
रु. ५,००० च्या मर्यादेत
पिक संरक्षण / सुधारित शेती औजारे
१००%
रु. १०,००० च्या मर्यादेत
बैलजोडी / रेडेजोडी
१००%
रु. ३०,००० च्या मर्यादेत
बैलगाडी
१००%
रु. १५,००० च्या मर्यादेत
जुनी विहीर दुरुस्ती
१००%
रु. ३०,००० च्या मर्यादेत
इनवेल बोअरिंग ( विहीरीत बोअर मारणे )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
पाईपलाईन ( ३०० मीटर पर्यंत )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
पंपसंच ( डिझेल इंजिन, इले. मोटर )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत
१०
नवीन विहीर खुदाई ( जवाहर योजना निकष )
१००%
रु. १,००,००० च्या मर्यादेत
११
शेततळे ( मृदसंधारण निकष )
१००%
रु. ३५,००० च्या मर्यादेत
१२
परसबाग ( प्रति गुंठा )
१००%
रु. २०० च्या मर्यादेत
१३
तुषारसिंचन / ठिबकसिंचन संच
१००%
रु. २५,००० हेक्टरच्या मर्यादेत
१४
ताडपत्री
१००%
रु. १०,००० प्रति लाभार्थीच्या मर्यादेत

अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

०१ कार्यक्रमाचे / योजनेचे नांव अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )
०२ लाभधारकांसाठी पत्रतेच्या अटी लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे.
०३ लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रमांक २ प्रमाणे
०४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती अर्जासह सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्या नंतर जिल्हा निवड समिती कडून लाभार्थी निवड होते. २ वर्षाच्या कालावधीत रक्कम रु.५०,०००/- पर्यंतच्या अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
०५ पात्रता ठरविण्याचे निकष आणि आवश्यक  कागदपत्रे लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे. मागणी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला सादर करावा.
०६ या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जाते

काय )

लाभार्थी निवड झाल्यानंतर त्याला पुढील प्रमाणे बाब निहाय लाभ दिला जातो. अ-१००% अनुदानाच्या बाबी

१)जलसिंचन – रु.२०,०००/- २) निविष्ठा रु.५,०००/-

३)औजारे व आयुधे रु.१०,०००/-

४) जमीन सुधारणा रु.४०,०००/-  ५) पाईपलाईन – २०,०००/-

६) जुनी विहीर दुरुस्ती रु.३०,०००/- ७) बैलगाडी/बैलजोडा रु.३०,०००/- ८) डीनवल बोअरिंग रु.२०,०००/- ९) परसबाग कार्यक्रम रु.२००/- १०) ताडपत्री रु.१०,०००/-मर्यादेपर्यंत

११) शेततळेरु.३५,०००/-पर्यंत. या प्रमाणे अनुदान देण्यात येते. या व्यतिरिक्त विहीर खुदाई करीता ७०,०००/-ते रु.१ लाखा पर्यंत अनुदान दिले जाते.

०७ अनुदान वाटपाची पद्धत वरील अनुक्रमांक ४,५,व ६ नुसार
०८ अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना पं.स.कार्यालय गडहिंग्लज.
०९ अर्जाबरोबर भरावयाची फी निरंक
१० अन्य फी निरंक
११ अर्जाचा नमुना कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना, यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध .
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,अपत्य दाखला व रहिवाशी दाखला.
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही विशिष्ट तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिका-याचे पदनाम कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापुर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडहिंग्लज
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल जिल्हा परिषद स्तरावर निधी उपलब्ध आहे.
१६ लाभाधारकांची प्रत्येक वर्षांगणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी सोबत जोडली आहे.
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )
१८ शेरा

कृषि औजारे व आयुध्ये वाटप योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नांव कृषि औजारे व आयुध्ये वाटप योजना
लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी 1)      लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी असावा.

2)      अनुदान वजा जाता भरावी लागणारी रक्कम भरणे आवश्यक.

लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती शासनाकडून योजना मंजूर होवून आले नंतर वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे पुर्तता करुन कागदपत्रे सादर करून औजारे किंवा आयुध्ये घेता येते.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे ८ अ चा उतारा, ७/१२ उतारा व ओळखपत्र
या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) सादर कार्यक्रमांतर्गत स्प्रे.पंप, नांगर, भात ऊफळणी पंखे, ताडपत्री, इत्यादी बाबींचा समावेश होतो.
अनुदान वाटपाची पद्धत औजारे किंवा आयुध्ये वाटप करते वेळीच अनुदान वजाजाता लागणारी रक्कम भरणा केली जाते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) अनुदान वजा जाता उर्वरित देय रक्कम
१० अन्य फी (असल्यास) काही नाही
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज को-या कागदावर करुन भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) ८ अ व ७/१२ चा उतारा
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही विशिष्ट तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिका-यांचे पदनाम कृषी विकास अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापुर

१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळी वर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) नाही.
१६ लाभाधारकांची प्रत्येक वर्षांगणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )

equipments

कृषी यांत्रिकी करणास अर्थ सहाय्य देणेची योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषी कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव कृषी यांत्रिकी करणास अर्थ सहाय्य देणेची योजना
लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी लाभार्थी अल्प भूधारक शेतकरी असावा.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या कार्यपद्धती केंद्रशासन पुरस्कृत योजने अंतर्गत कृषी यांत्रिकी करण्यास अर्थ सहाय्य देण्याच्या योजने अंतर्गत मंजूर असलेल्या पैकी जि बाब घ्यावयाची आहे. त्या बाबीचे कोटेशन सादर करून रोखीने अथवा बँक प्रकरण करून अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेता येतो. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ / मार्केटिंग फेडरेशन या संस्थे कडून करणे आवश्यक आहे.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे

८ अ व ७/१२ चा उतारा

या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशील द्यावा ) वरील योजने अंतर्गत लाभार्थीस यंत्रीकरण योजने अंतर्गत पॉवर स्ट्रेलर, रोटा व्हेटर, मळणी मशीन, या सारख्या बाबींचा लाभ घेता येतो. त्या बाबत किमतीच्या 25% अथवा मर्यादे पर्यंत लाभ देता येतो.
अनुदान वाटपाची पद्धत अनुदान वजा जाता लागणारी रक्कम भरून बाबींचा लाभ घेता येतो.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) काही नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे हि स्पष्ट करावे कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले दस्तऐवज ) अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदमान कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम,जिल्हा पातळीवर एवढी रक्कम  उपलब्ध वगैरे ) कृषी विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर स्तरावर.
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणित दिलेल्या नमुन्यानुसार यादी
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )
१८ शेरा ( असल्यास)