About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती, गडहिंग्लज

शिक्षण विभाग

शालेय पोषण आहार.

  •      योजनेचे स्वरूप –

केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार ही योजना प्राथमिक शाळांतील इ. १ली ते इ ५ वी तील मुलांना शासन निर्णय क्र. मुप्राशा १०९५/ २१३४ / प्राशि / २ मंत्रालय विस्तार भवन, मुंबई दि. २२/११/९५ नुसार व शासन निर्णय क्र. १००२/१२७५/०२ प्राशि – ४ मंत्रालय विस्तार भवन, दि. १६ मे २००२ नुसार सुरु झाली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील इ. १ली ते इ ५ वी मध्ये शिकणाऱ्या जि.प.शाळेतील न.पा., म.न.पा. तसेच अनुदानित / अंशतः अनुदानित खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना लाभ दिला जातो. वरीलप्रमाणे योजनेचे स्वरूप आहे.

  • अंमलबजावणी –

शासन निर्णय शालेय शिक्षण विभाग मंत्रालय, मुंबई क्र. मुप्राशा १०९५/ २१३४ / प्राशि / २ दि. २२/११/१९९५ प्रमाणे

सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना.

  • योजनेचे स्वरूप –

या योजनेअंतर्गत हालाखीची आर्थिक परिस्थिती मुळे शिक्षण मध्येच सोडाव्या लागणाऱ्या मुलींचे गळतीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी जिल्हा स्तरावर सावित्रीबाई फुले दत्तक मुलीस तिचे इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण होई पर्यंत दर महा रु.३०/- देण्यात येतील

  • योजनेचे निकष –

जे दत्तक पालक दत्तक मुलीच्या शिक्षणसाठी अर्थसहाय्य करू इच्छितात त्यांनी दरमहा रु. ३०/- अशी रक्कम परस्पर सदर मुलीला तिचे इ. ८ वी पर्यंतचे शिक्षण होई पर्यंत द्यावे व तिला शाळेत टिकून राहण्याच्या दृष्टीने प्रोत्साहित करावे. जे पालक परस्पर अर्थसहाय्य करू इच्छितात त्यांनी जिल्हास्तरावरील सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना निधी मध्ये आपला निधी जमा करू शकतात. ( दरमहा रु. ३०/- किंवा वार्षिक रु.३००/- अथवा रु. ३०००/- एकदाच आठ वर्षासाठी देणगी म्हणून देता येईल.)

  • अंमलबजावणी –

शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी .

  • योजनेचे स्वरूप –

या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मुला मुलींच्या पट नोंदणी मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना तसेच जिल्ह्यातील एक विस्तार अधिकारी शिक्षण यांना रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षिस दिले जाते.

  • योजनेचे निकष –

शाळेमध्ये मुलींची उत्कृष्ट पट नोंदणी करणे आवश्यक आहे. सदरची योजना ही जि.प. शाळेतील शिक्षकांसाठी आहे.

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून  गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

गणवेश व लेखन साहित्य वितरण.

  • योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकण घेणाऱ्या  अनुसूचित जाती, अनु. जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील दारिद्र्य रेषेखालील मुले व मुलींना प्रती वर्षी १ गणवेश, लेखन साहित्य दिले जाते. गणवेशांची शासनाने ठरविलेली रक्कम ग्राम शिक्षण समितीला दिली जाते व त्यामधून ग्राम शिक्षण समिती लाभार्थ्यास गणवेशाचा लाभ देते.

 

  • योजनेचे निकष –

मागासवर्गीय व दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी व १०३ विकास गटातील ( गगनबावडा व शाहुवाडी ) सर्व विद्यार्थी पात्र ठरतात.

 

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून  गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

विद्यार्थ्यांना–उपस्थिती भत्ता.

  • योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळातील इ.१ ली ते ४ थी मध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती अनु. जमाती विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रत्येक हजर दिवसासाठी रु.१ प्रमाणे वार्षिक रु. २२० /- चे मर्यादेत मदत केली जाते.
  • योजनेचे निकष –

प्रत्येक महिन्याला ७५% पेक्षा जास्त दिवस हजरी असणे आवश्यक

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावरून  गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

शिष्यवृत्ती परिक्षा माध्यमिक व पूर्व माध्यमिक परीक्षा फी .

  • योजनेचे स्वरूप –

या योजनेअंतर्गत 100 टक्के विद्यार्थ्यांना परीक्षेचा लाभ मिळावा व स्पर्धात्मक परीक्षांची आवड निर्माण व्हावी यासाठी परीक्षा फी मध्ये सवलत

 

  • योजनेचे निकष –

मागासवर्गीय मुलांची १०० टक्के फी व सर्वसाधारण घटकांतील मुलांची ५० टक्के फी भरणेत येते.

 

  • अंमलबजावणी – सदर योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावर गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केली जाते.

राजर्षि शाहू सर्वागींण शिक्षण व गुणवत्ता विकास कार्यक्रम .

  • योजनेचे स्वरूप – या योजनेअंतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुल शाळेत आणणे, सर्वागीण / दर्जेदार शिक्षण देणे, शिक्षकांची गुणवत्ता व उपक्रमशीलता वाढवणे, शिक्षकांना अधिक सक्षम करणे, शिक्षणाची लोक चळवळ निर्माण करणे, प्रशासन सुलभीकरण करणे, 100 टक्के विद्यार्थ्याची उपस्थिती, विद्यार्थ्याचा सर्वागीण विकास करणे, माता पालक संघ व शिक्षक पालक संघाची स्थापना करणे. एकूण शाळेची गुणवत्ता वाढवणे.

 

  • योजनेचे निकष –

विद्याथी सर्वागीण विकास उपक्रम, उपस्थिती बौध्दिक विकास, सराव चाचणी पध्दत, मूल्यशिक्षण, शारिरीक विकास, भावनिक विकास, राष्ट्रीयत्वाची जोपासना इ. संबंधी उपक्रम राबविणे, सामाजिक व पर्यावरण विषयक जाणीव निर्माण करणे, शिस्त व सहकार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम, विद्यार्थी गुणवत्ता वाढ, वैयक्तिक गुणवत्ता वाढ, सामाजिक सेवा कार्यक्रम व अन्य कार्यक्रम राबविण्यात येतात. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येतात. तसेच पालक उद्बोधन, महिला सबलीकरण, शैक्षणिक उठावासाठी व वंचित घटकासाठी उपक्रम राबविण्यात येतात.

 

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची आमंलबजावणी  तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केले जाते.

जि. प. शाळेतील विद्यार्थ्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा आयोजन करणे .

  • योजनेचे स्वरूप –

या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याची तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर सांस्कृतिक स्पर्धा घेणेत येते या स्पर्धेत विजयी होणाऱ्या विद्यार्थ्याना बक्षिस व प्रमाणपत्र दिले जाते.

 

  • योजनेचे निकष –

वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन गटांमध्ये तालुकास्तरावर स्पर्धा घेवून विजयी खेळाडूंना व संघाना जिल्हा स्तरावर स्पर्धेसाठी पाठविले जाते.

 

  • अंमलबजावणी –

सदर योजनेची आमंलबजावणी तालुकास्तरावरून गट शिक्षण अधिकारी व जिल्हा स्तरावर शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे मार्फत केले जाते.