About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती गडहिंग्लज

Agriculture Department

कृषि विभाग :
विभागाचे नाव – कृषि विभाग
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – ०२३२७ – २२२२३८

 

विभागाकडील कार्ये व कर्तव्ये :

  • शासनाच्या विविध प्रचलित योजना अंतर्गत सुधारित कृषि अवजारे, स्वयंचलित अवजारे ट्रॅक्टरचलीत अवजारे, पिक संरक्षण अवजारे, कीटकनाशके, जिवाणू संवर्धन पाकिटे व जीप्सम अनुदानावर वाटप करणे.
  • अनुदानावर बायोगॅस सयंत्र उभारणी करणे.
  • अनुसूचित जाती जमातींच्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व इतर बाबींचा अनुदानावर लाभ देणे.

गुणनियंत्रण

शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे दर्जेदार बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इ. विक्रीस उपलब्ध करून देणेसाठी गुणनियंत्रण यंत्रणा कार्यान्वित आहे. पंचायत समितीचे कृषी अधिकारी हे गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून कामकाज पाहतात.

बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके इ. खरेदी करताना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी : –   

  • बियाणे मान्यताप्राप्त, परवानाधारक विक्रेत्याकडून खरेदी करावीत.
  • सिलबंद पिशवीतील बियाणे घ्यावीत.
  • सुटे बियाणे खरेदी करू नये.
  • प्रमाणित बियाणे खरेदी करावी.
  • पिशवीच्या टॅगवर बियाण्याची क्षमता व प्रमाणित मोहोर असावी.
  • बियाणे / रासायनिक खते / कीटकनाशके मुदतबाह्य झालेले नाहीत यांची खात्री करावी.
  • संबंधित विक्रेत्याकडून छापील पावती घ्यावी व त्यावर बॅचचा लॅट नंबर नमूद असावा.
  • दुकानदाराची पावतीच्या प्रतीवर स्वाक्षरी घ्यावी.
  • बियाणे पेरते वेळी पिशवी खालून फाडावी आणि पिशवीसह थोडे बियाणे व लेबल जपून ठेवावी. याचा उपयोग बियाणाची उगवण न झाल्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी होईल.

बियाणे उगवणे बाबत तक्रार असलेस तत्काळ बियाणे पिशवीसह तालुका कृषी अधिकारी / कृषी अधिकारी , पंचायत समिती यांच्याकडे लेखी तक्रार नोंदवावी.

खते, बियाणे व कीटकनाशके विक्री केंद्र सुरु करणेसाठी व परवाना नुतनिकरणासाठी  www.mahaagri.gov.in  ही वेबसाईट पहावी.