ग्रामपंचायत विभाग :
गडहिंग्लज तालुक्यामध्ये ८८ स्वतंत्र ग्रामपंचायती व १ ग्रुप ग्रामपंचायत आहे. सदर ८९ ग्रामपंचायतीचे प्रशासन चालविण्याकरिता ग्रामसेवकांची ६३ पदे मंजूर असून ५६ ग्रामसेवक कार्यरत आहेत. तसेच विस्तार अधिकारी (पंचायत) यांची ३ पदे मंजूर असून १ विस्तार अधिकारी (पंचायत) कार्यरत आहेत.
विभागाचे नांव – पंचायत विभाग, गडहिंग्लज
कार्यालय प्रमुख – मा.श्री. एस. ए. वाखडे, गट विकास अधिकारी(वर्ग – १)
कार्यक्षेत्र – गडहिंग्लज तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती.
संक्षिप्त कार्ये – टेबलनिहाय नेमून दिलेली कामे संलग्न केलेले सुचीप्रमाणे.
विभागाचे ध्येय धोरण :
- तालुक्यातील ग्रामिण भागाचा विकास, शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना राबविणे.
- तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे सनियंत्रण करणे.