About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती गडहिंग्लज

कृषि विभाग

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना
लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी लाभार्थीकडे पशुधन उपलब्ध असावे, बायोगॅस बांधकामासाठी घराजवळ मोकळी जागा उपलब्ध असावी.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती लाभार्थीने बायोगॅसचे बांधकाम पंचायत समिती अथवा संस्थेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करताच त्याची पहाणी करुण जसे अनुदान उपलब्ध होईल त्याप्रमाणे अनुदान वाटप केले जाते.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे पशुधनाबाबत ग्रामसेवक यांचा दाखला व रिकाम्या जागेबाबतचा उतारा
या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) बायोगॅस पूर्ण झालेनंतर व शासनाकडून अनुदान प्राप्त होताच लाभार्थीस त्याचे नावे अनुदान आदा केले जाते.
अनुदान वाटपाची पद्धत वरील अनुक्रम नंबर ६ प्रमाणे
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) काही नाही.
१० अन्य फी (असल्यास) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज को-या कागदावर करुन भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. कृषि विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) वरील अनुक्रम नंबर ५ प्रमाणे
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना वरील अनुक्रम नंबर ५ प्रमाणे

बायोगॅस सयंत्र व अनुदान – 

सयंत्रची क्षमता
सर्वसाधारण लाभार्थीसाठी अनुदान रु.
अनुसूचित जाती लाभार्थीसाठी अनुदान
१ घनमिटर
५,५००/-
७,०००/-
२ ते ६ घनमिटर
९,०००/-
११,०००/-
बायोगॅसला शौचालय जोडलेस सर्वसाधारण व अनिसुचीत जातीसाठी रु. १,२००/- अतिरिक्त अनुदान मिळते.

 

विशेष घटक योजना

अनुसूचित जाती / नवबौद्ध शेतकऱ्यांना दारिद्रयरेषेच्या वर आणणेची योजना (विशेष घटक योजना )

१. लाभार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असावा. जातीचा दाखला तहसीलदार, प्रातांधिकारी यांच्याकडील असावा .

२. लाभार्थीकडे स्वत:चे नावे जमीन असणे आवश्यक आहे. जमिनीचे क्षेत्र ६ हेक्टर पेक्षा कमी असावे.

३. ७/१२ व ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.

४. लाभार्थीचे वार्षिक उत्पन ५०,०००/- पेक्षा कमी असले बाबत तहसिलदार यांचा दाखला असणे आवश्यक आहे.

५. यापूर्वी  सादर योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

६. जे लाभार्थी दारिद्रय रेषे खालील आहेत त्यांना ग्रामसेवक, तलाठी यांच्या सहीचे दाखले चालतात.

अर्ज पंचायत समिती कृषी विभागामार्फत सादर करावा.

अनुदान मर्यादा  – जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेतील त्यांचे साठी रु १,00,000/- व जे लाभार्थी नवीन विहिर या घटकाचा लाभ घेणार नाहीत त्यांचे साठी रु.  ५०,०००/- कमाल मर्यादा राहील.

योजनेअंतर्गत बाबवर कमाल अनुदान दर्शविणारा तक्ता

अ.नं.
बाब
अनुदान टक्केवारी
कमाल अनुदान मर्यादा
जमीन सुधारणा
१००%
रु. ४०,००० च्या मर्यादेत मृदसंधारण निकषानुसार
निविष्ठा पुरवठा ( खते, बियाणे, औषधे इ.)
१००%
रु. ५,००० च्या मर्यादेत
पिक संरक्षण / सुधारित शेती औजारे
१००%
रु. १०,००० च्या मर्यादेत
बैलजोडी / रेडेजोडी
१००%
रु. ३०,००० च्या मर्यादेत
बैलगाडी
१००%
रु. १५,००० च्या मर्यादेत
जुनी विहीर दुरुस्ती
१००%
रु. ३०,००० च्या मर्यादेत
इनवेल बोअरिंग ( विहीरीत बोअर मारणे )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
पाईपलाईन ( ३०० मीटर पर्यंत )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
पंपसंच ( डिझेल इंजिन, इले. मोटर )
१००%
रु. २०,००० च्या मर्यादेत
१०
नवीन विहीर खुदाई ( जवाहर योजना निकष )
१००%
रु. १,००,००० च्या मर्यादेत
११
शेततळे ( मृदसंधारण निकष )
१००%
रु. ३५,००० च्या मर्यादेत
१२
परसबाग ( प्रति गुंठा )
१००%
रु. २०० च्या मर्यादेत
१३
तुषारसिंचन / ठिबकसिंचन संच
१००%
रु. २५,००० हेक्टरच्या मर्यादेत
१४
ताडपत्री
१००%
रु. १०,००० प्रति लाभार्थीच्या मर्यादेत

अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

०१ कार्यक्रमाचे / योजनेचे नांव अनुसूचित जाती उपयोजना ( विशेष घटक योजना )
०२ लाभधारकांसाठी पत्रतेच्या अटी लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे.
०३ लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रमांक २ प्रमाणे
०४ या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती अर्जासह सर्व कागदपत्रांची पुर्तता केल्या नंतर जिल्हा निवड समिती कडून लाभार्थी निवड होते. २ वर्षाच्या कालावधीत रक्कम रु.५०,०००/- पर्यंतच्या अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
०५ पात्रता ठरविण्याचे निकष आणि आवश्यक  कागदपत्रे लाभार्थी अनुसूचित जातीचा शेतकरी असावा. वार्षिक उत्पन्न रु.५०,०००/- पर्यंत असावे. मागणी अर्जासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला सादर करावा.
०६ या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जाते

काय )

लाभार्थी निवड झाल्यानंतर त्याला पुढील प्रमाणे बाब निहाय लाभ दिला जातो. अ-१००% अनुदानाच्या बाबी

१)जलसिंचन – रु.२०,०००/- २) निविष्ठा रु.५,०००/-

३)औजारे व आयुधे रु.१०,०००/-

४) जमीन सुधारणा रु.४०,०००/-  ५) पाईपलाईन – २०,०००/-

६) जुनी विहीर दुरुस्ती रु.३०,०००/- ७) बैलगाडी/बैलजोडा रु.३०,०००/- ८) डीनवल बोअरिंग रु.२०,०००/- ९) परसबाग कार्यक्रम रु.२००/- १०) ताडपत्री रु.१०,०००/-मर्यादेपर्यंत

११) शेततळेरु.३५,०००/-पर्यंत. या प्रमाणे अनुदान देण्यात येते. या व्यतिरिक्त विहीर खुदाई करीता ७०,०००/-ते रु.१ लाखा पर्यंत अनुदान दिले जाते.

०७ अनुदान वाटपाची पद्धत वरील अनुक्रमांक ४,५,व ६ नुसार
०८ अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना पं.स.कार्यालय गडहिंग्लज.
०९ अर्जाबरोबर भरावयाची फी निरंक
१० अन्य फी निरंक
११ अर्जाचा नमुना कृषि अधिकारी, अनुसूचित जाती उपयोजना, यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध .
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला,अपत्य दाखला व रहिवाशी दाखला.
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही विशिष्ट तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिका-याचे पदनाम कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापुर, गट विकास अधिकारी, पंचायत समिती गडहिंग्लज
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल जिल्हा परिषद स्तरावर निधी उपलब्ध आहे.
१६ लाभाधारकांची प्रत्येक वर्षांगणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी सोबत जोडली आहे.
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )
१८ शेरा

कृषि औजारे व आयुध्ये वाटप योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषि कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नांव कृषि औजारे व आयुध्ये वाटप योजना
लाभधारकासाठी पत्रतेच्या अटी 1)      लाभार्थी अल्पभूधारक शेतकरी असावा.

2)      अनुदान वजा जाता भरावी लागणारी रक्कम भरणे आवश्यक.

लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेली कार्यपद्धती शासनाकडून योजना मंजूर होवून आले नंतर वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे पुर्तता करुन कागदपत्रे सादर करून औजारे किंवा आयुध्ये घेता येते.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे ८ अ चा उतारा, ७/१२ उतारा व ओळखपत्र
या योजनेतून मिळणा-या लाभांचा तपशिल (अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशिल द्यावा ) सादर कार्यक्रमांतर्गत स्प्रे.पंप, नांगर, भात ऊफळणी पंखे, ताडपत्री, इत्यादी बाबींचा समावेश होतो.
अनुदान वाटपाची पद्धत औजारे किंवा आयुध्ये वाटप करते वेळीच अनुदान वजाजाता लागणारी रक्कम भरणा केली जाते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी (असल्यास) अनुदान वजा जाता उर्वरित देय रक्कम
१० अन्य फी (असल्यास) काही नाही
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज को-या कागदावर करुन भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे ही स्पष्ट करावे. कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे (शिफारस पत्रे / दाखले / दस्तएवज ) ८ अ व ७/१२ चा उतारा
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही विशिष्ट तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिका-यांचे पदनाम कृषी विकास अधिकारी,

जिल्हा परिषद कोल्हापुर

१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम, जिल्हा पातळी वर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) नाही.
१६ लाभाधारकांची प्रत्येक वर्षांगणिक दिलेल्या नमुन्या नुसार यादी
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )

equipments

कृषी यांत्रिकी करणास अर्थ सहाय्य देणेची योजना

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषी कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव कृषी यांत्रिकी करणास अर्थ सहाय्य देणेची योजना
लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी लाभार्थी अल्प भूधारक शेतकरी असावा.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या कार्यपद्धती केंद्रशासन पुरस्कृत योजने अंतर्गत कृषी यांत्रिकी करण्यास अर्थ सहाय्य देण्याच्या योजने अंतर्गत मंजूर असलेल्या पैकी जि बाब घ्यावयाची आहे. त्या बाबीचे कोटेशन सादर करून रोखीने अथवा बँक प्रकरण करून अनुदानाची रक्कम वजा जाता उर्वरित रक्कम भरून योजनेचा लाभ घेता येतो. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ / मार्केटिंग फेडरेशन या संस्थे कडून करणे आवश्यक आहे.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे

८ अ व ७/१२ चा उतारा

या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशील द्यावा ) वरील योजने अंतर्गत लाभार्थीस यंत्रीकरण योजने अंतर्गत पॉवर स्ट्रेलर, रोटा व्हेटर, मळणी मशीन, या सारख्या बाबींचा लाभ घेता येतो. त्या बाबत किमतीच्या 25% अथवा मर्यादे पर्यंत लाभ देता येतो.
अनुदान वाटपाची पद्धत अनुदान वजा जाता लागणारी रक्कम भरून बाबींचा लाभ घेता येतो.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) काही नाही.
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे हि स्पष्ट करावे कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले दस्तऐवज ) अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदमान कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम,जिल्हा पातळीवर एवढी रक्कम  उपलब्ध वगैरे ) कृषी विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर स्तरावर.
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणित दिलेल्या नमुन्यानुसार यादी
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास )
१८ शेरा ( असल्यास)

तालुका पातळी पिक स्पर्धा

पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषी कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –

कार्यक्रमाचे / योजनेचे नाव तालुका पातळी पिक स्पर्धा
लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी  लाभार्थी शेतकरी असावा.ज्या पिक स्पर्धेत भाग घेणार आहे त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्र आवश्यक. प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क रुपये 20/- कृषी विभागात भरणे.
लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी     वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे
या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या कार्यपद्धती पिकाची कापणी पूर्ण झाल्या नंतर गुणानुक्रमे पहिल्या तीन लाभार्थींना बक्षिस, प्रशस्तीपत्र, व पुढील वर्षी जिल्हा पातळी वर भाग घेण्यास पात्र व क्रमांक ४ साठी फक्त जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र.
पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे ज्या पिक स्पर्धेत भाग घेणार आहे.त्या पिकाखाली किमान १० आर क्षेत्र असलेचा ७/१२ उतारा
या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशील द्यावा ) गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुक्रमे रुपये २५००/- रुपये १५००/- व रुपये १०००/- एवढ्या रकमेचे बक्षिस व प्रशस्तीपत्र व पुढील तीन वर्षे जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र. क्रमांक चार साठी पुढील तीन वर्षे जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र.
अनुदान वाटपाची पद्धत निकाल जाहीर झालेनंतर व शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नंतर शेतकऱ्यांना चेकने अनुदान देणेत येते.
अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? तालुका पातळीवर गट विकास अधिकारी
अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) तालुका पातळीसाठी रुपये २०/- फक्त
१० अन्य फी ( असल्यास ) काही नाही.
११ अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे हि स्पष्ट करावे कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध
१२ सोबत जोडावयाची परिशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले दस्तऐवज ) ७/१२ उतारा
१३ त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना
१४ कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदमान कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
१५ उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम,जिल्हा पातळीवर एवढी रक्कम  उपलब्ध वगैरे ) अद्याप प्राप्त नाही.
१६ लाभधारकांची प्रत्येक वर्षागणित दिलेल्या नमुन्यानुसार यादी
१७ उद्दिष्ट ( ठरविले असल्यास ) १(एक)

 

crops