About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती गडहिंग्लज

Integrated Child Development Service Department

एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग :
विभागाचे नाव – एकात्मिक बालविकास सेवा योजना विभाग
खाते प्रमुखाचे पदनाम – बालविकास प्रकल्पअधिकारी
विभागाचा दुरध्वनी क्रमांक – ९९२१२०९८९८

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजना कशासाठी..?

  • देशाच्या मानवी साधनसंपदेचे संवर्धन करण्यासाठी.
  • कोवळ्या बालवयातच, मुलांच्या शरीराच्या, मनाच्या आणि सामाजिक जाणीवेच्या विकासाचा भरभक्कम पाया घालण्यासाठी.
  • बालमृत्यू, शारीरीक अपंगत्व, कुपोषण, शाळाशिक्षणात प्रगती असूनही शिक्षण अर्धवट सोडावे लागण्याची परिस्थीती आणि विकसनक्षमतेची प्रतिकूलता यांच्यामुळे उद्‌भवणारा अपव्यय टाळण्यासाठी, आणि
  • बाल विकासाच्या क्षेत्रामध्ये जनतेचा सामूहिक सहभाग लाभावा आणि बाल विकासाच्या कार्यक्रमाला स्वयंपूर्णता प्राप्त व्हावी यादृष्टीने चालना देण्यासाठी.

 

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्देश :

  • 0 ते 6 वयोगटातील मुलांचा पोषण व आरोग्य दर्जा सुधारणे.
  • मुलांचा योग्य मानसिक, शाररिक व सामाजिक विकासाचा पाया घालणे
    बालमृत्यूचे, बालरोगाचे, कुपोषणाचे व मध्येच शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे.
  • बाल विकासाला चालना मिळावी म्हणून विविध विभांगांमध्ये धोरण व अंमलबजावणी याबाबत परिणामकारक समन्वय साधणे.
  • योग्य पोषण व आरोग्य विषयक शिक्षणाद्वारे बालकांचे सर्वसामान्य आरोग्य व त्यांच्या पोषण विषयक गरजांकडे लक्ष पुरविण्याबाबत मातांची क्षमता वाढविणे.