About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती गडहिंग्लज
Menu

आरोग्य विभाग

जि.प.स्वनिधी.

१ मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थींना रु. १०,०००/- व २ मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या लाभार्थीस ५,०००/- लाभ हा जि.प.स्वनिधीमधून दिला जातो.

चिरायु योजना.

सदर योजना जि.प. स्वनिधीमधुन नाविन्यपूर्ण राबवली जात असून या योजनेंतर्गत काम करणाऱ्या आशास्वयंसेविका, गटप्रवर्तक व तालुका समुह संघटक यांचेसाठी दरमहा प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येत आहे. या योजनेचे उद्दिष्ट अर्भक मृत्यू, बाल मृत्यू, उपजत मृत्यूचे प्रमाण कमी करणे तसेच बालकांचे आरोग्य… Continue reading

मोफत आहार.

गरोदर स्त्री बाळंतपणासाठी दवाखान्यात आल्यानंतर घरी जाईपर्यंत मोफत जेवणाची सुविधा केली जाते.

जननी शिशु सुरक्षा योजना.

गरोदर स्त्रीला बाळंतपणासाठी घरातून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यातून पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी व दवाखान्यातून परत घरी सोडण्यासाठी मोफत सोय केली जाते. तसेच ० ते २ वर्षापर्यंतची बालके आजारी असल्यास घरातून दवाखान्यापर्यंत, दवाखान्यातून पुढील उपचारासाठी पाठविण्यासाठी व दवाखान्यातून परत घरी सोडण्यासाठी मोफत सोय केली जाते.

जननी सुरक्षा योजना.

अनुसूचित जाती / जमाती किंवा दारिद्र्य रेषेखालील गरोदर स्त्रीचे बाळंतपण दवाखान्यात झालेले असल्यास त्या व्यक्तीस रु. ७००/- इतका लाभ दिला जातो.

जि.प.स्वनिधी शस्त्रक्रिया मदत.

जि.प.स्वनिधीमधुन हृदय शस्त्रक्रिया, कॅन्सर, व किडणी रोपन रुग्णास आर्थिक मदत केली जाते. १) हृदय शस्त्रक्रियारु.१०,०००/- २) किडणी रोपन रु.१०,०००/- ३) कॅन्सर उपचार रु.७,०००/-

राजीव गांधी अपघात योजना

पंचायत समिती गडहिंग्लज शिक्षण विभाग येथील शासकीय प्रोत्साहनपर योजनांच्या कार्यवाहीची पद्धत – १ कार्यक्रमाचे / योजनेचे नाव राजीव गांधी अपघात योजना २ लाभधारकासाठी पात्रतेच्या अटी अपघात, वाहनाचे नुकसान, शैक्षणिक, साहित्य नुकसान ३ लाभ मिळण्यासाठी असलेल्या पुर्व अटी अपघात पंचनामा, वैद्यकीय… Continue reading