पंचायत समिती गडहिंग्लज येथील कृषी कार्यालय या सार्वजनिक प्राधिकरणातील अनुदान वाटपाची पद्धत –
१ | कार्यक्रमाचे / योजनेचे नाव | तालुका पातळी पिक स्पर्धा |
२ | लाभधाराकासाठी पात्रतेच्या अटी | लाभार्थी शेतकरी असावा.ज्या पिक स्पर्धेत भाग घेणार आहे त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेत्र आवश्यक. प्रवेश अर्ज व प्रवेश शुल्क रुपये 20/- कृषी विभागात भरणे. |
३ | लाभ मिळण्यासाठी असलेल्या पूर्व अटी | वरील अनुक्रम नंबर दोन प्रमाणे |
४ | या योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या कार्यपद्धती | पिकाची कापणी पूर्ण झाल्या नंतर गुणानुक्रमे पहिल्या तीन लाभार्थींना बक्षिस, प्रशस्तीपत्र, व पुढील वर्षी जिल्हा पातळी वर भाग घेण्यास पात्र व क्रमांक ४ साठी फक्त जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र. |
५ | पात्रता ठरविण्याचे निकष आणि कागदपत्रे | ज्या पिक स्पर्धेत भाग घेणार आहे.त्या पिकाखाली किमान १० आर क्षेत्र असलेचा ७/१२ उतारा |
६ | या योजनेतून मिळणाऱ्या लाभांचा तपशिल ( अनुदान अथवा अन्य मदत दिली जात असेल, तर तो ही तपशील द्यावा ) | गुणानुक्रमे पहिल्या तीन क्रमांक प्राप्त करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुक्रमे रुपये २५००/- रुपये १५००/- व रुपये १०००/- एवढ्या रकमेचे बक्षिस व प्रशस्तीपत्र व पुढील तीन वर्षे जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र. क्रमांक चार साठी पुढील तीन वर्षे जिल्हा पातळीवर भाग घेणेस पात्र. |
७ | अनुदान वाटपाची पद्धत | निकाल जाहीर झालेनंतर व शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नंतर शेतकऱ्यांना चेकने अनुदान देणेत येते. |
८ | अर्ज कोठे करावा अथवा अर्ज करण्यासाठी कार्यालयात कोणाला भेटावे ? | तालुका पातळीवर गट विकास अधिकारी |
९ | अर्जाबरोबर भरावयाची फी ( असल्यास ) | तालुका पातळीसाठी रुपये २०/- फक्त |
१० | अन्य फी ( असल्यास ) | काही नाही. |
११ | अर्जाचा नमुना ( जेथे असा नमुना ठरविलेला असेल तेथे ) जर अर्ज कोऱ्या कागदावर करून भागणार असेल तर त्या अर्जदाराने किमान कोणती माहिती भरली पाहिजे, हे हि स्पष्ट करावे | कृषी विभाग पंचायत समिती यांचे कडे उपलब्ध |
१२ | सोबत जोडावयाची परिशिष्टे ( शिफारस पत्रे / दाखले दस्तऐवज ) | ७/१२ उतारा |
१३ | त्या परिशिष्टांचा काही विशिष्ट नमुना असलेस तो नमुना | |
१४ | कार्यवाही बद्दल काही तक्रार असेल, तर ती कोणाकडे करावयाची, त्या अधिकाऱ्यांचे पदमान | कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर |
१५ | उपलब्ध रकमेचा तपशिल ( उदाहरणार्थ, तालुका पातळी वर एवढी रक्कम,जिल्हा पातळीवर एवढी रक्कम उपलब्ध वगैरे ) | अद्याप प्राप्त नाही. |
१६ | लाभधारकांची प्रत्येक वर्षागणित दिलेल्या नमुन्यानुसार यादी | |
१७ | उद्दिष्ट ( ठरविले असल्यास ) | १(एक)
|