About Panchayat Samiti Gadhinglaj

गडहिंग्लज पंचायत समिती ही तालुक्यातील ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्य करीत आहे. गडहिंग्लज पंचायत समितीचे संकेतस्थळ कार्यान्वीत करतांना डिजिटल इंडियाचा मुख्य हेतू प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.


Read More 

Digital Grampanchayat Project

डिजिटल इंडिया अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे ग्रामपंचायतींचा विकास होण्यासाठी आम्ही 'डिजिटल ग्राम' संकल्पना राबवली आहे.


Read More

Panchayat Samiti Schemes

पंचायत समिती मधील विविध योजना व त्याची परिपूर्ण माहिती तसेच विविध विभागांची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करण्यांत आली आहे. योजनाविषयक माहितीचा समाजातील प्रगत घटकाबरोबरच समाजातील दुर्बल व शेवटच्या घटकापर्यंत मिळण्यास मदत होईल.


Read More 

पंचायत समिती, गडहिंग्लज

News

गडहिंग्लज पंचायत समितीवर ‘राष्ट्रवादी’ची हॅट्ट्रिक

गडहिंग्लज – येथील पंचायत समितीच्या 10 पैकी 7 जागा जिंकून राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेची हॅट्ट्रिक साधली. तालुक्‍यातील पाच गटांवरही पक्षाने कब्जा मिळविला. विरोधी कॉंग्रेस, जनता दल, जनसुराज्य व शेकाप आघाडीला पंचायत समितीत केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादीमधून बंडखोरी करून भडगाव गणातून अपक्ष लढणारे अमर चव्हाण 1519 मताधिक्‍याने विजयी झाले.

तालुक्‍यात चुरशीने निवडणूक झाली. राष्ट्रवादीचा विजयाचा वारू रोखण्यासाठी “गोकुळ’चे माजी अध्यक्ष राजकुमार हत्तरकी, ऍड. श्रीपतराव शिंदे, प्रकाश चव्हाण, नानासाहेब पताडे यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या कॉंग्रेस, जनता दल, जनसुराज्य व शेकाप आघाडीला जनतेने सपशेल नाकारले. दोन दशकांत केलेला विकास व भविष्यातील विकास आराखडा सोबत घेऊन राष्ट्रवादीचे नेते बाबा कुपेकर यांनी तालुक्‍यात स्वबळावर निवडणूक लढविली. श्री. हत्तरकींच्या हलकर्णी आणि श्री. शिंदेंच्या नूल बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीने ‘जोर का झटका’ दिला.

हलकर्णी गटातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागप्रमुख राजेंद्र गड्ड्यान्नावर यांना चार हजार मतांचा शेतकऱ्यांनी दिलेला कौल दखल घेण्याजोगा आहे. नूल गटातील राष्ट्रवादीचे शिवप्रसाद तेली पाच हजार मताधिक्‍याने विजयी झाले. पंचायत समितीचे उमेदवार तानाजी कांबळे, इक्‍बाल काझी यांनीही एक ते दोन हजार मताधिक्‍याने विजय संपादन केला. या गटाच्या निकालाद्वारेच राष्ट्रवादीने तालुक्‍यात विजयी सलामी दिली. भडगाव गटातील राष्ट्रवादीचे अप्पी पाटील तालुक्‍यात सर्वाधिक 13147 मते घेऊन विजयी झाले. मीनाताई जाधव यांच्या विजयाने नेसरी गट कायम राखण्यात कुपेकरांना यश मिळाले असले, तरी नेसरी गणात राष्ट्रवादीचे मुन्ना नाईकवाडी यांना 106 मतांनी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. कडगाव गटात कॉंग्रेसच्या क्रांतिदेवी कुराडे यांना राष्ट्रवादीच्या शैलजा पाटील यांच्याकडून 2892 मतांनी पराभव स्वीकारावा लागला. शिवसेनेचे वसंत नाईक, धनश्री गुरव, भाजपच्या निर्मला पोवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बसवराज मुत्नाळे, सुनीता चौगुले यांनीही नशीब आजमावले; परंतु मतदारांनी त्यांना नाकारले. जनसुराज्य शक्तीतून बंडखोरी करून भडगाव गणात अपक्ष म्हणून रिंगणात असलेले साखर कारखान्याचे संचालक रमेश आरबोळे यांचाही पराभव झाला.

सकाळी साडेनऊला गांधीनगरातील पालिकेच्या पॅव्हेलियनमध्ये मतमोजणी सुरू झाली. दहा वाजता नूल गटाचा निकाल जाहीर झाला. ध्वनिक्षेपकाद्वारे निकाल जाहीर होत होता. निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली, सहायक अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेने तीन तासांत निकाल जाहीर करून जिल्ह्यात आघाडी घेतली. पोलिस निरीक्षक आर. टी. जगताप यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त होता.

अपक्षाचा झेंडा…
तालुक्‍याच्या निवडणुकीत अमर चव्हाण यांच्या रूपातून पहिल्यांदाच अपक्ष उमेदवार विजयी झाल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्याने श्री. चव्हाण यांनी बंड केले होते. याच गणात सर्वाधिक उमेदवार रिंगणात होते. निकालाबाबत श्री. चव्हाण म्हणाले, “”तालुक्‍यात भडगाव गणातील मतदारांचा कौल ऐतिहासिक आहे. हा माझा विजय नसून, कार्यकर्त्यांचा आहे. माझ्या रूपातून मतदारांनी कार्यकर्त्यालाच न्याय दिला आहे.”